सेवानिवृत्ती समारंभ: निष्कलंकीत सेवा करण्याचे भाग्य लाभले:मिलिंद गायकवाड

नांदेड

नांदेड,बातमी24:- पाण्यासारख्या विषयात काम करण्याची तीस वर्षे सेवा मिळाली, या सारखी मोठी संधी आणि भाग्य लाभणे असू शकत नाही, शेकडो शेतकऱ्यांना विहीरीची योजना हातून राबविता आली, यातून हिरवीगार बहरलेली मळे, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि मैलोनमैल पाण्यासाठी वणवण करणारे माणसाचे हाल थांबविता आले,ही सगळ्यात मोठी नोकरीमध्ये उपलब्धी असल्याचे भावनिक उदगार उपअभियंता मिलिंद गायकवाड यांनी काढले,ते सेवानिवृत्ती समारंभप्रसंगी बोलत होते.

जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात कार्यरत उपअभियंता असलेल्या मिलिंद गायकवाड यांचा निरोप समारंभ गुरुवार दि.31 रोजी झाला.यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता राम लोलापुरे,म्हणून जेष्ठ नेते सुरेश गायकवाड,कार्यकारी अभियंता एस.ई. बाविस्कर,वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख शिवा नरंगले, ओबीसी नेते रोपते आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले,की
माझ्या नोकरीच्या काळात जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून तीस वर्षे सेवा करता आली, सेवा काळात कुठेही पदाला गालबोट लागू दिले नाही. करोडो रुपयांच्या योजना राबवित असताना शेतकरी व सामन्य लोकांना घरापर्यत पाणी कसे देता येईल, इतकाच विचार करत राहिलो,यातून होतकरू कंत्राटदार ही उभे करता आले.दर्जेदार कामे करणे यावर माझा भर राहिला,चांगला उद्देश ठेवून काम करताना काहींची नाराजी ओढवली असेल, परंतु चांगले काम करण्याचे भाग्य माझ्या नशिबी आल्याचे सांगत त्यांना यावेळी भावना अनावर झाल्या.

यावेळी राम लोलापुरे, सुरेश गायकवाड,बाविस्कर यांची शिवा नरंगले यांची भाषणे झाली.यावेळी उपअभियंता बारगळ,भोजराज,सरनाईक, बोडके,डिकले, चव्हाण,नाईक,संतोष दासरवार,राजू श्रीमानवार,गौतम मोगले,किशोर नागठाणे,त्रिरत्न भवरे,रोपते,जुबेर शेख,साजिद काझी,हंबर्डे,सलीम शेख आदींची उपस्थिती होती.