जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिमझीम; शेतकरी पेरणीच्या लगबगीत

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेड मृगनक्षेत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवार दि. 16 जून रोजी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात मागच्या चौविस तासांमध्ये… इतका पाऊस नोंदला गेला आहे. तर सर्वाधिक पाऊस लोहा तालुक्यात कलंबर 63 तर नांदेड तालुक्यातील तुप्पा भागात 52 मिलीमिटर झाला आहे.

मृगनक्षत्र सुरु होऊन दहा दिवस झाले आहेत. या दहा दिवसांच्या काळात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मागच्या वर्षी सुद्धा मृगनक्षात पाऊस दमदार झाला होता.त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली होती. यंदा ही पाऊस पेरणीजोग्य पडत असल्याने शेतकरी पेरणीच्या लगबगीला लागला आहे. शेतकर्‍यांच्या दृष्टीने चित्र सुखावणारे ठरत आहे.

मागच्या चौविस तासांमध्ये लोहा तालुक्यातील कलंबर मंडळात 63 मिलीमिटर, सोनखेड मंडळात 52, माहुर तालुक्यातील वानोळा मंडळात 42, धर्माबाद शहरात 32, उमरी 41, किनवट तालुक्यातील मांडवी मंडळात 42, दहेली मंडळात 46 तर नांदेड तालुक्यातील तुप्पा मंडळा 52 तर नांदेड शहरात 29 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागच्या चौविस तासांमध्ये 267.98 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या पावसाची सरासरी 16.75 इतकी आहे. तर वार्षिक सरासरीच्या 183 मिलीमिटर पाऊस आतापर्यंत पडला आहे. तर एकूण सरासरी 10.95 इतकी आहे.
——
तालुकानिहास पावसाची मिलीमिटरमध्ये नोंद

नांदेड- 31.25, मुदखेड-15.00, अर्धापुर-15.00, भोकर-16.75, उमरी-27.00, कंधार-11.67, लोहा-27.33, किनवट-17.57, माहुर-25.25, हदगाव-9.71, हि.नगर-8.00, देगलूर-5.67, बिलोली-10.20, धर्माबाद-18.67, नायगाव-11.20, तर मुखेड-17.71