नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 256 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर रविवारी 328 जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
रविवारी 1 हजार 243 जणांची चाचणी करण्यात आली. यात 842 जणांची चाचणी निगेटीव्ह आली, तर 328 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 87 व अंटीजनमध्ये 241 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 8 हजार 910 झाली आहे. यातील 5 हजार 653 जण बरे झाले आहेत. रविवारी सुद्धास 208 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या 2 हजार 337 जणांवर उपचा सुरु असून यातील 256 जण हे मृत्यूशी तोंड देत आहेत.
328 जणांमध्ये नांदेड शहरात 146, मुखेड-67, किनवट-14, नायगाव-18, बिलोली-10, नांदेड ग्रामीण-13, मुदखेड-7, कंधार-7, लोहा-9 तसेच उर्वरीत तालुक्यातील संख्या एकेरी अंकात आहे.
——
सात जणांचा मृत्यू
किनवट येथील दत्त नगर भागात राहणार्या 60 वर्षीय पुरुषाचा दि. 6 रोजी, हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील 50 वर्षीय महिलेचा दि. 4 रोजी, कंधार येथील व्यंकटेशनगर भागात राहणार्या 85 वर्षीय पुरुषाचा दि. 5 रोजी, कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव 70 वर्षीय महिलेचा दि. 5 रोजी, नांदेड येथील तथागत नगर येथील 57 वर्षीय पुरुषाचा दि. 5 रोजी, वजिराबाद येथील 49 वर्षीय पुरुषाचा दि. 6 रोजी, तर मुदखेड तालुक्यातील शिकारा येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि.6 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 265 झाली आहे.