अठरा हजारांपैकी सोळा हजार जणांची कोरोनावर मात

नांदेड

नांदेड, बातमी24ः मागच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना बाधितांच्या वाढीचा वेग काही दिवसांमध्ये मंदावत चालला आहे. आतापर्यंत अठरा हजार लोक या संसर्गामुळे बाधित झाले असले, तरी सोळा हजार जणांनी यावर मात केली. 483 बाधितांचा या या संसर्गामुळे मृत्यू झाला तर आजघडिला 1 हजार 565 जणांवर उपचार सुरु आहेत.

रविवार दि. 18 रोजी 755 संशयितांची तपासणी करण्यात आली.यामध्ये 657 अहवाल निगेटीव्ह आले. तर 92 जण संक्रमित झाले आहेत. आतापर्यंतची बाधित रुग्णांची संख्या 18 हजार 79 एवढी, असून यातील 15 हजार 918 जणांनी कोरोनावर मात केली. 483 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला, असून 44 रुग्णांची प्रकृती नाजूक आहे.
———
तीन जणांचा मृत्यू
सिडको येथील 55 वर्षीय महिलेचा दि. 17 रोजी मृत्यू झाला. नरसी नायगाव येथील 67 वर्षीय पुरुषाचा दि. 17 रोजी तर हदगाव तालुक्यातील घोगरी येथील 37 वर्षीय पुरुषाचा सुद्धा दि. 17 रोजी मृत्यू झाला.