नांदेड,बातमी24 :-कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर एकल कलाकाराना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एकल कलावंत यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करावेत लाभार्थ्यांनी 10 दिवसाच्या आत म्हणजे 30 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच एडके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
त्यानुसार पात्र असलेल्या प्रती कलाकारास पाच हजार रुपये अर्थसहाय देण्यात येणार असून यामध्ये एकुण 1500 कलावंताची निवड करण्यात येणार आहे. एकल कलाकारांनी अर्जासाठी जोडायची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. नमुन्यातील अर्ज, रहिवाशी प्रमाणपत, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तवाचा दाखला,स्थानिक स्वराज्यसंस्थेचा दाखलाही ग्राहय असेल . तहसीलदाराकडून प्राप्त उत्पनाचा दाखला, कलेचा क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याचा पुरावा, आधार कार्ड व बँक खाते तपशिल, शिधा पत्रिका सत्यप्रत, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलावंत मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही. जिल्ह्यातील एकल कलाकारांनी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.