चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्ताव वेळेत सादर करा:-शिक्षण समिती बैठकीत बेळगे यांच्या सूचना

नांदेड

नांदेड,बातमी24:-शिक्षकांची सेवा 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रस्ताव गटशिक्षण अधिकारी यांनी जिल्ह्यास तपासून तात्काळ सादर करावेत, अशी सूचना नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज शिक्षण समितीच्या बैठकीत केली.
बैठकीस ज्येष्ठ सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड ,साहेबराव धनगे ,संध्याताई धोंडगे ,अनुराधा पाटील ,जोत्स्ना नरवाडे,शिक्षक सदस्य बसवराज पाटील ,शिक्षणतज्ञ सदस्य संतोष देवराये यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले. मागील बैठकीत दिलेल्या सूचनांचे अनुपालन सादर केले.
शिक्षकांना देण्यात येणाऱ्या चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी यापूर्वी मार्च 2021 ही सेवा तारीख धरली होती. आता ती मे 2021 ही गृहीत धरण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाभर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा अशी सूचना केली.
प्राथमिक व माध्यमिक विभागांतर्गत प्रति वर्षी उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच कार्यक्रम आयोजनाबद्दल कळविण्यात येईल, असे सभापती संजय बेळगे यांनी सांगीतले.