नव्या भागातही कंटेन्मेंट झोन वाढणार

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेड शहरात कोरेानाच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे जसे नव-नव्या भागात रुग्ण वाढणार ते प्रतिबंधित क्षेत्रही वाढत जाणार आहे. यापूर्वी नांदेड शहरात 32 प्रतिबंधित क्षेत्र होते. यात आज वाढलेल्या रुग्णांमुळे वाढ होऊन आकडा पन्नासपर्यंत जाणार आहे.

ग्रामीण भागापेक्षा नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. आजघडिला नांदेड जिल्हयात कोरेानाच्या रुग्णंसंख्या 256 इतकी झाली, असली, तरी कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 167 पोहचली आहे. तर उपचार घेणारे रुग्ण हे 75 आहेत. एखादा भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून त्या भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाते.

शासनाच्या आदेशान्वये 28 दिवस प्रतिबंधित क्षेत्रातील बॅरिकेटस काढले जात नाही. प्रशासनातील कर्मचारी वर्गाकडून अत्यांवश्यक सुविधा त्या भागात पुरविल्या जातात, असे प्रतिबंधित क्षेत्र नांदेडमध्ये यापूर्वीचे 32 आहेत, तर आज 22 रुग्ण सापडले आहेत. या विजय कॉलनी, पद्मजा सिटी, यशवंत नगर, न्यायनगर, श्रीकृष्णनगर, विनकर कॉलनी, संत ज्ञानेश्वर चौक, झेंडा चौक, दीपनगर,एचआयजी कॉलनी व चैतन्य नगर या भागास कंटेन्मेट झोन करून बॅरिकेटस उभारण्याचे काम झाले आहे.