नांदेड, बातमी24ःकाही दिवसांपूर्वी कोरोनामुळे संक्रमित झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार राहिलेल्या मुकुंद चावरे यांचे शनिवार दि. 26 रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले.
कोरोनाच्या संसर्गासह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ही वाढत आहे. यात काही दिवसांपूूर्वी मुकुंद चावरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारास प्रतिसाद न मिळू शकल्याने त्यांची प्राणज्योत सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मावळली.
मयत मुकुंद चावरे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू व निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. यातूनच चावरे यांना सन 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत चावरे यांनी पंचविस हजाराहून अधिक मते मिळविली होती.आहेत.पश्चात पत्नी, तीन मुली व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार
——
मार्गदर्शक हरपला- प्रशांत इंगोले
मुकुंद चावरे हे चळवळीचा आक्रमक व निष्ठावंत चेहरा होते. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू शिलेदारांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची भावना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी व्यक्त केली.