आतापर्यंतची सर्वाधिक मृत्यूची नोंद; रुग्ण संख्या पुन्हा चारशे

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद शुक्रवारी नोंदविली गेली, असून तब्बल बारा जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहेत. तर पुन्हा एकदा मृत्यूचा आकडा चारशेच्या जवळ जाऊन पोहचला आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे, दुरुस्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी 261 झाली आहे.

शुक्रवार दि. 11 सप्टेंबर रोजी 1 हजार 656 जणांची तपासणी करण्यात आली. यात 1 हजार 183 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर 396 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 10 हजार 709 झाली आहे. तसेच आतापर्यंत 6 हजार 745 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजघडिला 3 हजार 608 जणांवर उपचार सुरु असून 55 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
——
नांदेडमध्ये दोनशे रुग्ण
नांदेड शहरात 203 नवे रुग्ण, नांदेड ग्रामीण-26, मुखेड-29, लोहा-16, नायगाव-16, बिलोली-17, अर्धापुर-11, किनवट-20, धर्माबाद-13 अशी सर्वाधिक नोंद आहे.
——-
बारा जणांचा मृत्यू

हिमायतनगर येथील 37 वर्षीय महिलेचा दि. 9 रोजी, हदगाव तालुक्यताील कौठा येथील 65 वर्षीय महिलेचा दि. 10 रोजी, मुखेड येथील नवीपेठ भागातील 68 वर्षीय पुरुषाचा दि. 10, लोहा येथील आंबेडकर नगर येथील 80 वर्षीय पुरुषाचा मुखेड तालुक्यातील पाला येथील पुरुषाचा दि. 10 रोजी, देगलूर येथील इब्राहिमपूर येथील 60 वर्षीय महिलेचा, कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि. 10 रोजी, किनवट येथील 85 वर्षीय महिलेचा दि. 10 रोजी, नायगाव तालुक्यातील सावरगाव येथील 70 वर्षीय महिलेचा दि. 10 रोजी, नांदेड येथील आंबेडकर नगर येथील 65 वर्षीय महिलेचा दि. 10 रोजी, कुंडलवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा तर फ रांदे नगर येथील 81 वर्षीय पुरुषाचा दि. 11 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची मृत्यांची संख्या 218 एवढी झाली आहे.