महिला व बालकल्याण विभागाची बैठक ठरली तापदायक

नांदेड

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुशीला हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली विभागाची व्यापक बैठक ज्या बैठकीत कोरोना संदर्भाने नियमांचे पालन न केल्यामुळे तापदायक ठरल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर जिल्ह्यातील तीन बाल विकास प्रकल्प अधिकारी हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

महिला व बालकल्याण समितीची बैठक दि. 6 रोजी घेण्यात आली होती. या बैठकीच्या दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी मुदखेड येथील बालविकास प्रकल्प अधिकारी तिडके हे कोरोना पॉझिटीव्ह आले. त्या बैठकीत एकमेकांच्या बाजूने बसलेले भोकर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी राहूल शिवकत्ते हे कोरोना पॉझिटीव्ह आले. त्याचसोबत लोहा येथील चटलावार हे सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, भोकरच्या सीडीपीओ शिवशक्ते यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य सुद्धा पॉझिटीव्ह आले आहे.

त्या दिवशी महिला व बालकल्याण समितीची बैठक तब्बल साडे तीन तास चालली. या विभागाचे जिल्हाभरातील अधिकारी बैठकीला बोलविले होते. या बैठकीच्या ठिकाणी कोरेानाच्या संदर्भाने कुठलेही सोशल अांतर पाळण्यात आले होते. तीन सीडीपीओ हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर महिल व बालविकास अधिकारी सुनील शिंगणे हे सुद्धा होम क्वॉरंटाईन झाले आहे.