कोरोनाची रुग्णसंख्या नऊ हजार पार; सात जणांचा मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या रुग्णांची संख्या आजही तिनशेपार गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या नऊ हजार 246 एवढी झाली आहे. तर सात जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने दाखविली आहे.

सोमवार दि. 7 रोजी 1 हजार 236 जणांची तपासणी करण्यात आली.833 जणांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह तर 336 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर चाचणीत 174 व अंटीजनमध्ये 162 जणांचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत 9 हजार 246 जणांना कोरोना झाला,तर 5 हजार 834 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी सु द्धा यातील 191 जणांचा समावेश आहे. सध्या 3 हजार 78 जणांवर उपचार सुरु आहेत. तर गंभीर रुग्णांची संख्या अडीचशे ते तिनशे असताना प्रशासनाने सदरची आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न केला, असून केवळ अतिगंभीर रुग्णांची संख्या दाखविली, असून ती संख्या 41 एवढी आहे.

आजच्या आलेल्या तपासणीमधील 336 रुग्णांमध्ये सर्वाधिक 130 रुग्ण हे नांदेड शहरातील आहेत.हदगाव-31, मुखेड-23, नायगाव-22, बिलोली-19, माहूर-19, कंधार-16, देगलूर-12,लोहा-16 अशी रुग्ण संख्या आहे.
——–
सात जणांचा मृत्यू
नांदेड शहरातील लोकमित्र नगर येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि. 6 रोजी, सिडको भागातील शिवाजी चौक येथील 50 वर्षीय पुरुषाचा दि. 7 रोजी, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 46 वर्षीय पुरुषाचा दि. 7 रोजी, हदगाव येथील 87 पुरुषाचा दि. 7 रोजी, नांदेड येथील गोकुळ नगर येथील 70 वर्षीय महिलेचा दि. 7 रोजी, मुदखेड तालुक्यातील बारड येथील 60 वर्षीय महिलेचा दि. 7 रोजी तसेच पिंपळगाव कोरका येथील 50 वर्षीय पुरुषाचा दि. 6 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 272 एवढी झाली आहे.