हे असतील नांदेडचे नवे जिल्हा व सत्र न्यायाधीश

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक धुळकिया हे दि. 31 जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त आहे. या रिक्त होणार्‍या जागेवर सिंधदुर्ग येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हे रजू होणार आहे, या संबंधीचे आदेश प्राप्त झाले आहेत.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून दीपक धुळकिया यांनी नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा दि. 1 मार्च 2019 रोजी पदभार स्विकारला होता. दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त आहे. श्री. धुळकिया निवृत्तीनंतर सिंधदुर्ग येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. जगताप हे पदभार स्विकारणार आहेत.