दोनशे बाधितांना सुट्टी तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24:- जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 200 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 131 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या एकुण 798 अहवालापैकी 655 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 452 एवढी झाली असून यातील 13 हजार 8 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 913 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 65 बाधितांची प्रकृती अतीगंभीर आहे.

या अहवालात शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी निवघा मुदखेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष यांचा खाजगी रुग्णालय नांदेड येथे तर रविवार 4 ऑक्टोंबर रोजी दयानंद नगर नांदेड येथील 80 वर्षाची एक महिला, अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील 60 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी नांदेड तर सोमवार 5 ऑक्टोंबर रोजी दत्तनगर नांदेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष, कंधार येथील 65 वर्षाची एक महिला यांचा जिल्हा रुग्णांलय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 431 झाली आहे.