जिल्ह्यात दोन खून घटना उघकीस

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात वेगवेगळया कारणांवरून दोन खुनाच्या घडल्या आहेत. एक घटना भोकर तालुक्यातील भोसी शिवारात उघडकीस आली, तर एक घटना उमरी तालुक्यात घडली आहे.

भोकर तालुक्यातील भोसी येथील युवक विनय प्रभाकरराव कल्याणकर यांच्या संदर्भाने दि. 3 जुलै रोजी मिसिंगची तक्रार कुटुंबियांनी दिली होती. या युवकाचे प्रेत भोसी शिवारात मंगळवार दि. 7 जुलै रोजी सकाळी सापडले, या घटनेची माहिती होताच भोकर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते.या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता.

दुसर्‍या खुनाची घटना उमरी तालुक्यातील बोलाळ येथिल शेत शिवारात उघडकीस आली. मारोती गंगाधर गाडेकर (वय.24) असे मयताचे नाव असून गळा आवळून खून केल्याची बाबसमोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या प्रकरणी अन्याथ मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.