संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध; प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पालन करा:-डॉ.इटनकर

महाराष्ट्र

 

नांदेड, बातमी24:- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.कोरोनाच्या सासर्गाला अटकाव घातला यावा,या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कडक निर्बंधाच्या सूचना जारी केल्या आहेत. यात सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवता येणार आहेत.तसेच काही दिवस आठवडी बाजार सुद्धा बंद असणार आहे.

दिलेल्या आदेशात म्हटले,की दि.12 मार्च ते 21 मार्च या दरम्यान शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद राहणार आहेत.दुकाने सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत कोरोनाच्या नियमांचे पालन करून चालू ठेवता येणार आहेत. दि.15 मार्च पर्यंत नियोजित असलेले मंगल सोहळे यास सर्व नियम पाळून म्हणजे 50 जणांच्या सहभागात करता येऊ शकतील, त्यानंतर दि.16 पासून मंगल कार्यालय,लॉन्स,हॉल तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या लग्नसमारभ व इतर सार्वजनिक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे.हॉटेक,बार हे रात्री 8 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेवर चालू राहतील,सामाजिक,धार्मिक व राजकीय कार्यक्रमपूर्णपणे बंद राहतील,धार्मिकस्थळ हे सात वाजेपर्यंत तेही 50 लोकांपेक्षा अधिक नसावेत, आदी उपाय योजनांचे कोविड-19 च्या अनुषंगाने सर्वांना पालन करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी कळविले आहे.