सीईओ वर्षां ठाकूर यांच्या तत्परतेसह दुरदृष्टीने दिला मुलींना सुखद धक्का

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर या मुदखेड दौर्‍यावर गेल्या असता, मुगट येथील एका वाडयाच्या उंबरठयावर दोन मुली अभ्यास करत असल्याची त्यांची नजर त्या मुलींवर पडली. या वेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चालकास गाडी थांबवायला लावून थेट त्या दोन मुलींशी अभ्यासविषयी त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. या मुलींकडून शाळा, अभ्यासाविषयी माहिती जाणून घेत अभ्यास करून मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. सीईओ वर्षा ठाकुर यांनी दाखविलेली तत्परता व दुरदृष्टीमुळे पाहून या गावातील पालकांनी एकाप्रकारे समाधान व्यक्त केले.

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी रुजू झाल्यापासून काम करण्याची धडपड दिसून येत आहे. कार्यालयात अधिक काळ गुंतून न बसता जास्तीत-जास्त वेळ त्या ग्रामीण भागात जाऊन भेटी-गाठीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते. यासंबंधी पाहणी करण्यासाठी त्या पंचायत समिती स्तरावर दौरा करत आहेत.

या दौर्‍यादरम्यान मुगट येथून जात असताना एका वाडयाच्या उंबरठयावर दोन मुली अभ्यास करत असल्याचा सुखद दृष्य त्यांच्या नजरी पडले. गाडी थांबवून त्या मुलींशी संवाद साधला. पुष्पा ज्ञानेश्वर कदम व दिपिका रामकिशन कदम असे दोघींचे नावे आहेत. दहावीमध्ये पुष्पा तर दिपिका चौथी या वर्गात शिकते. त्या दोन्ही मुलींना आपल्याशी कोण बोलतायेत, त्या सीईओ म्हणजे काय असते. हे सुद्धा माहित नव्हते. कुणातरी मोठया मॅडम असाव्यात इतकेचा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली भावना होती.

यावेळी मुलींना वर्षा ठाकुर यांनी अभ्यासविषयी माहिती विचारली, यावर मुलींनी समाधानकार उत्तरे दिली. त्यांच्या अभ्यासाची असलेली गोडी व गुण पाहून वर्षा ठाकूर या सुद्धा समाधानी झाल्या.पुढील काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पुढील काळात परिणाम होऊ नये, यासाठी लवकरच अभियान चालविले जाईल, असे आश्वासन देत तेथून त्यांचा निरोप घेतला. याबद्दल गावातील कुणीतरी सीईओ आपल्या मुलींशी येऊन संवाद साधल्याचे ऐकूण समाधान व्यक्त केले.