पोलीस महासंचालकास नांदेड न्यायालयाची चपराक;गुटखा माफियांना अभय देणाऱ्या परिपत्रकास केराची टोपली

महाराष्ट्र

 

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24:- गुटखा माफियांकडे साठा सापडला ,तरी अशांवर गुन्हा नोंद करताना 328 कलम लावू नये,असे परिपत्रक काढणाऱ्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकास नांदेड न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली,असून या प्रकरणातील एका गुटखा माफियास 328 कलमानव्ये पोलीस कोठडीची हवा खावी लागली. गुटखा माफियांना अभय देण्याचा पोलीस महासंचालकांनी केलेला प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला,असून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे सर्वत्र भाग पडणार आहे.

राज्यात गुटखा,पान मसाला,सुगंधी तंबाखू,सुगंधी सुपारी तसेच तत्सम पदार्थ आदींवर बंदी आहे.
या अशा पदार्थ विक्री करणाऱ्या माफियांवर विविध कलमांव्ये फौजदारी कारवाई केली जाते, यात 328 हे कलम गुटखा माफियांचे कंबरडे मोडणारे आहे. 328 कलमानुसार पोलीस कोठडी व तीन महिने जमीन न देणे अशी आरोपी संदर्भात तरतूद आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी गुटखा विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,त्यानुसार राज्यभरात शेकडो कारवाया केल्या जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून नांदेड येथील सिडको भागातील ढवळे कॉर्नर येथे दि.9 रोजी अजय पंडित याच्या पान टपरीवर धाड मारली,असता साडे सहा हजार रुपये किंमतीचा गुटखा पकडला होता.पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर अजय पंडित याने कुठून माल आणला याबाबत पोलिसांना माहिती दिली,त्यावरून जुना गंज भागातील गुटखा माफिया शेख कयूम शेख इब्राहिम याच्या दुकानावर धाड टाकून 4 लाख 78 हजार रुपयांचा माल ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली.

या प्रकरणी न्यायालयात त्या आरोपीस हजर केले असल्या, आरोपीच्या वकिलाने पोलीस महासंचालकांनी दि.11 मार्च 2021 रोजी काढलेल्या परिपत्रक याचा आधार घेत 328 कलमाबाबत सर्वोच न्यायालयात आदेशास्तव प्रलंबित आहे.त्यामुळे आरोपीस 328 कलम लागत नाही,अशी बाजू मांडली.

यावर सरकारी वकील हाके यांनी फिर्यादी पक्षाच्या बाजूने असलेल्या उच्च न्यायालयाच्या विविध तीन निवाड्याच्या प्रति तसेच सर्वोच न्यायालयाचे स्थगन अभिलेखावर असल्याने असू हे प्रकरण निवाड्यासाठी प्रलंबित आहे.आरोपीस 328 कलम लागू होते.त्यामुळे आरोपीस पीसीआर मंजूर करण्याची मागणी केली.

यावर चौथे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अदिती नागोरी यांनी सर्वोच न्यायालयाने 328 कलमाबाबत उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयास स्थगन आदेश दिले,असून ते स्थगन आदेश या न्यायालयास बंधनकार आहे.त्यामुळे पोलीस महासंचालकानी काढलेले परिपत्रक या न्यायालयास बंधनकारक नाही,असे स्पष्टपणे नमूद करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला,त्यामुळे पोलीस महासंचलक यांनी काढलेले परिपत्रकाची नांदेडच्या न्यायालयाने चिरफाड करत, गुटखा माफियांना अभय देण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.