दोन नेत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण

महाराष्ट्र

नांदेड, बातमीः- श्री. गुरुगोविंदसिंघजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळयास आमंत्रित करण्यात न आल्याचा मुदावरून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची चांगलीच तिळपापड झाली. यावरून त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांवर टीकास्त्र केले. यावर उत्तर देताना आमदार अमरनाथ राजूरकर यांनी रेल्वे शाळा व पोस्ट बँकेचे केलेले उद्घाटन ही चिखलीकरांची खासगी मालमत्ता आहे काय असा सवाल केला. उद्घाटन सोहळयास एकमेकांना टाळण्याचा प्रकार म्हणजे, कुरघोडीचा भाग मानला जात आहे.

नांदेडच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे राजकीय वैर सर्वसुत आहे. राजकारणात एकमेकांना शह देण्याची संधी अशोक चव्हाण असो, की प्रताप पाटील चिखलीकर हे कधीच सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव करत प्रताप पाटील चिखलीकर हे विजयी झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आघाडीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकामंत्री झाले.

मंत्रीमंडळात वजनदार खाते व जिल्ह्याच पालकमंत्री अशोक चव्हाण झाल्याने प्रशासकीय पातळीवर अशोक चव्हाण यांच्याकडे पुन्हा जिल्ह्याची कमांन्ड आली आहे. शक्य तिथे प्रताप पाटील चिखलीकर यांना दाबले जात आहे. चार दिवसांपूर्वी रुग्णालय इमारतीच्या उद्घाटन सोहळयास न बोलविण्याचा बाब प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जिव्हारी लागली आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी खासगी मालमत्ता असल्यासारखे शासकीय इमारतीचे उद्घाटन करू नये, तसेच प्रशासनाने सुद्धा राजशिष्टाचाराचे पालन करण्याच्या राजधर्म प्रशासनाच्या ध्यानी आणून दिला. यावरून राजूरकर म्हणाले, की रेल्वे शाळा व पोस्ट बँकेचे उद्घाटनास आमदार असताना मला सुद्धा डावलले गेले होते. तेव्हा खासगी मालमत्ता होती काय ? असा सवाल राजुकर यांनी केला असता, तरी राजूकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केलेली टीका पलटवून लावण्याचा प्रयत्न केला. यास मात्र चिखलीकर यांनी दाद दिली नाही.

 

आपण आम्हाला बोलविले नाही, त्यामुळे आम्ही आपणास बोलविणार नाही. तसेच झाल्याचे दिसून येते. म्हणजे एकाप्रकारे हे एकमेकांविषयी सुडाचे राजकारण सुरु असल्याची चर्चा सामान्यांमध्ये सुरु झाली आहे. अशोक चव्हाण यांनी रुग्णालयाचे लोकार्पण करताच ऐंशी व्हेंटीलेटर चिखलीकर यांनी शासकीय रुग्णालयास मिळवून दिल्या.