नांदेड, बातमी24:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन दिवसांवर आली आहे. या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मोहन पाटील टाकळीकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला,असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व्यकटेश जिदम यांनी निवडणुकीतून माघार घेत पाठींबा दर्शविला.
मोहन पाटील टाकळीकर हे इतर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातून उभे असून त्यांच्या विरोधात व्यंकटेश गोविंदराव जिंदम यांनी उमेदवारी दाखल केली होती.मात्र नामनिर्देशनपत्र त्यांनी माघार न घेता,निवेदन काढत मी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे माझे समर्थन व पाठींबा या मतदारसंघातील उमेदवार मोहन पाटील टाकळीकर यांना जाहीर करत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
मोहन पाटील टाकळीकर यांची निशाणी असलेल्या हेलिकॅप्टर या निवडणूक निशाणीवर मत नोंदवून विजयी करण्याचे आवाहन जिंदम यांनी केले.स्वतः उमेदवार असलेल्या व्यंकटेश जिंदम यांनी माघार घेतल्याने मोहन पाटील टाकळीकर यांचा विजय सहज सोपा झाला आहे