काळजीपोटी आमदाराने केली पत्नीसह कोरोना चाचणी

राजकारण

नांदेड, बातमीः24- कोरोनाच्या महामारीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. मिटर वेगाने पळाल्यासारखे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात राजकारणी मंडळी म्हणल्यास बाहेर फि रावेच लागते. लोकांशी संपर्क ठेवावाच लागतो. या काळजीतूनच नांदेड जिल्ह्यातील एका तरूण आमदार व जिल्हा परिषद सदस्य असलेल्या त्यांच पत्नीने कोरोनाची चाचणी करून घेतली आहे.

नांदेड जिल्ह्यात सामान्यांसह येथील राजकारण्यांना सुद्धा कोरोना होऊन गेला आहे. यामध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण व नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे आता एका भाजपचे बडया पदावरील पदाधिकारी हे सुद्धा कोरोनाशी लढा देत आहेत. काळजीपोटी शंका आली, की चाचणी करून घेत आहेत. सदरची बाब आवश्यक सुद्धा आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार व त्यांच्या सुविद्यपत्नी पुनम पवार हे मतदारसंघात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने दौरे करत असतात. दोन दिवसांपूर्वी नायगाव, उमरी व धर्माबाद येथील कोविड सेंटरला भेटी दिली होती. तेथील काही जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. डॉक्टरांच्या सल्यानुसार दोघांनी सुद्धा स्वतःचे स्वॅब दिले आहेत. चाचणीचा रिपोर्ट अद्याप आला नसून माझी प्रकृती ठणठणीत असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.

मागच्या तीन महिन्यांपासून मतदारसंघात कोरेानाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना केली पाहिजे, यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा, रुग्णालय भेट असे कार्यक्रम सुरु आहेत. आमदार म्हणून माझे कर्तव्य आहे, असे राजेश पवार यांनी सांगितले.