विष्णुपुरीच्या पाण्यावरून खा. हेमंत पाटील यांना आ. हंबर्डे यांनी फ टकारले

राजकारण

नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी प्रकल्पात वरच्या भागातून आलेले पाणी पुढे सोडण्याची घाई न करता या प्रकल्पावरील डेरला, सोनखेड तसेच आसपासचे दहा तलाव आधी भरून घ्या, मग विष्णुपुरी जलाशयातून पाणी सोडा, अशी सूचना हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनाला दिली होती. यावरून नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी हेमंत पाटील यांना माझ्या मतदारसंघात लुडबुड करू नका असा सल्ला देत मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है असा उपोधिक टोला लगावला.

खासदार हेमंत पाटील हे सन 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये नांदेड दक्षीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. विष्णुपुरी जलाशय पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला आहे. या जलाशयातील पाणी सोडून न देता, या प्रकल्पावरील लहान प्रकल्प भरून घेण्याची विधायक सूचना एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून हेमंत पाटील यांनी केली होती. मात्र हेमंत पाटील यांनी दिलेली सूचना आमदार मोहन हंबर्डे यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले. त्यामुळे मेरे आंगणे मे तुम्हारा क्या काम है असा सवाल काँग्रेेसचे मुखपत्र असलेल्या सत्यप्रभा या दैनिकाच्या माध्यमातून मोहन हंबर्डे यांनी विचारला आहे.

प्रत्येक वर्षी उन्हाळयात पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. यंदा मान्सून चांगले आहे. परिणाम शंभर टक्के विष्णुपुरी जलाशय भरला आहे. या जलाशयातील पाणी खाली सोडून न देता या प्रकल्पावरील लहान सहान दहा प्रकल्प आहेत. ते भरून घेतले, तर उन्हाळयातील पिण्याचा व शेतीचा प्रश्न मार्गी लागेल, असे हेमंत पाटील यांनी निर्देशनास आणून दिले होते.

या संबंधीचे मागणी आपण यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे मागच्या महिन्यात दि. 27 रोजी केली होती. असा दावा आमदार हंबर्डे यांनी केला आहे. दुसर्‍याच्या कामाचे श्रेय घेण्याचा उद्योग हेमंत पाटील यांनी चालविल्याचा आरोप हंबर्डे यांनी केला. विष्णुपुरी जलाशयाच्या पाण्यावरून हिंगोली खासदार हेमंत पाटील व काँग्रेसचे नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यात जुपल्याचे या निमित्ताने बघायला मिळाले.