कुंडलवाडी, बातमी24:-
कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी भाजपच्या उमेदवार शेख रिहाना यांचा पराभव केला.
शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांना १० तर भाजपचे उमेदवारास ६ व एक उमेदवार तटस्थ राहिले आहेत.या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी विजय झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिली.
कुंडलवाडी नगरपरिषदेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी १ आँक्टोबरला पोटनिवडणुक पार पडली.नगरपरिषदेत १७ सदस्यांपैकी शिवसेना ३,काँग्रेस ४ व भाजप १० असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेत गत साडेतीन वर्षापासून मनमानी व एकला चलो चा कारभार चालु होता.काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पोतनकर यांनी अरूणा कुडमुलवार यांना अपात्र करण्यासाठी उच्च न्यायालयापर्यत लढाई लढविली होती. न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासनाने ही अरुणा कुडमुलवार यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणावरून नगराध्यक्ष पोट निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला.
महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांना ११ तर भाजपच्या उमेदवार शेख रिहाना यांना ६ मते मिळाली.एक नगरसेवक तटस्थ राहिले.यात शिवसेनेचे उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांनी भाजपचे उमेदवार शेख रिहाना यांचा पराभव केला.