नांदेड दिवसाढवळया खून; तीन दिवसांतील खुनाची दुसरी घटना

क्राईम

नांदेड, बातमी24ः नांदेड शहरात रविवारी रात्री विकास चव्हाण यांच्या गोळया झाडत धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घुण हत्या केल्याची घटनेची शाई वाळते न वाळते गुरुवारी भर दुपारी एका चाळीस वर्षीय इसमाची शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना खडकपुरा चौकात घडली.

खडकपुरा येथील मदिना हॉटेलसमोर महमद सरवर महमद कैसर (40) हे उभा राहिले असताना नयुम खान अयुब खान याने माझ्याकडे काय रागाने बघतोस अशी विचारणा करत घरातील धारदार शस्त्र आणून महमद सरवर महमद कैसर यांच्यावर हल्ला चढवित गंभीर जखमी केले. येथे उभे असलेल्या काही नागरिकांनी शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. या वेळी डॉक्टरांनी मयत घोषित केले. आरोपी नयुम खान अयुब खान यास वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले, असून याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.