रात्री झालेल्या गोळीबारात एक ठार

क्राईम

नांदेड,बातमी24ः रविवारी रात्री गाडेगाव रोडवर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह हसापुर येथील पुलाखाली सकाळी आढळून आला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.ही घटना गँगवारमधून घडल्याचे बोलले जात आहे.

रविवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पूर्व वळण रस्त्यावर स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या गुंडानी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकावर गोळीबार केला. जखमी झालेल्या युवकास स्कॉर्पिओमध्ये बसवून नेण्यात आले. या प्रकरणाचा शोध रात्रीपासून पोलिस घेत होते. गोळीबारात मृत्यू पावलेल्या युवकाचा मृतदेह हसापुर शिवारात नदी काठी सोमवारी सकाळी आढळून आला. मयताचे नाव विक्की चव्हाण असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे