नांदेड,बातमी24:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन सोशल मीडियावर अपमानकारक पोस्ट करणा-यावर कडक करून नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यावी असे कळविण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात सद्या वाईट्अप व फेसबुक या सोशल मिडीयावर बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानकारक पोस्ट करण्याचे प्रकार वाटले आहेत.
याबाबत पोलीस प्रशासनास कळवून ते हि बाब गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आल्यामुळे तमाम बहुजन समाजात नाराज झाला आहे.याचे प्रतिसाद उमटून नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.पुढील अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून नांदेड जिल्हाधिकारी यांनी पोलीस प्रशासनास सोशल मीडियावर पोस्ट करणा-यावर तात्काळ कडक कारवाई करावी.अपमानकारक पोस्ट केल्याबद्दल बिलोली पोलीस ठाणे,अर्धापूर पोलीस ठाणे,ग्रामीण नांदेड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार सुध्दा देण्यात आल्यानंतर सुध्दा आरोपीविरुद्ध कडक कारवाई अद्याप ही करण्यात आली नाही.तेव्हा जिल्ह्याधिकारी यांनी पोलीस कडक कारवाई करण्याचे आदेशीत करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी नांदेडकडून जिल्ह्याभर आंदोलन छेडण्यात येईल.व पुढील होणा-या परिणामास जिल्ह्या प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले,राज्य प्रवक्ते फारूख अहमद,गोविंद दळवी, महानगराध्यक्ष आयुबभुई,जिल्ह्य उपाध्यक्ष एस.एस. वाटोरे,कनिष्क सोनसळे,सचिन नवघडे,जयदिप पैठणे आदीची उपस्थिती होती.