नांदेड, बातमी24ः माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड पंचायत समितीच्या सभापतीने वंचिज बहुजन आघाडीत रविवारी प्रवेश केला.पंचायत समिती सभापतीचा वंचितमधील प्रवेश हा चव्हाण यांना धक्का मानला जात आहे.
मुदखेड पंचायत समिती सभापती असलेले बालाजीराव सुर्यतळे यांनी दोन दिवसांपूर्वी आकोला येथे जाऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.त्यानंतर रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद घेऊन प्रवेशाची घोषणा जाहीर केली. त्याचसोबत या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या सुमित्रा काजाळकर यांचे पती पिंटू पाटील काजाळकर हे सुद्धा हजर होते. त्यामुळे पंचायत समिती सदस्या सुमित्रा काजाळकर यांचा सुद्धा प्रवेश निश्चित मानला जात आहे.याचसोबत भोकरमधील काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा वंचितमध्ये प्रवेश झाला आहे.
बालाजी सुर्यतळे मुदखेड तालुक्यातील निवघा गणातून काँग्रेसच्या तिकिटावर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडून आले होते.जानेवारी महिन्यात झालेल्या पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत बालाजी सुर्यतळे यांची अशोक चव्हाण यांनी वर्णी लावली होती. एकाप्रकारे सुर्यतळे यांचा वंचित प्रवेश हा अशोक चव्हाण यांना धक्का मानला जात आहे.