त्या आजारी रुग्णास चिखलीकर यांचा हातभार

ताज्या बातम्या

 

नांदेड,बातमी24: उमरी तालुक्यातील रोहिदास भिमराव पवळे रा.पळसगाव येथील तरुणाची दोन्ही किडणी निकामी झाली. गेल्या वर्षापासून रोहिदास औषोधोपचारासाठी वनवन भटकत आहे. मंगळवारी सकाळी बैलगाडीतून रोहिदासला घेवून त्यांची आई पंचफुलाबाई पवळे व भाऊ पांडूरंग पवळे यांनी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर, नांदेड येथील निवासस्थानी घेवून आले. यावेळी चिखलीकर यांनी मदतीचा हात देत यापुढे रुग्णास नांदेडला घेऊन येण्यास गाडी येईल,असा शब्द दिला.यावेळी पवळे कुटूंब भारावून गेले होते.

आपल्या निवासस्थानासमोर सकाळी – सकाळी बैलगाडी घेवून कोण आले याची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यानंतर उमरीहून तरुण रुग्ण्‍ भेटण्यासाठी आल्याने समजल्यानंतर खा.चिखलीकर यांनी रोहिदासची भेट घेवून आस्थेवाईकपणे चौकशी केली. रुग्णाला असे बैलगाडीतून घेवून येण्यापेक्षा मला फोन करा वाहनाची व्यवस्था करतो असे आश्वासन देवून रोहिदास पवळे यास रोख आर्थिक मदत केली. यानंतरही औषोधोपचारासाठी मदत केली जाईल. चिंता करु नका असा दिलासा दिल्यामुळे पवळे कुटूंबियांना खासदार आपल्या पाठीशी असल्याचा अनुभव येताच गहिवरुन आले होते हे विशेष.