जिल्हा नियोजन समिती 14 जणांची शिफारस

ताज्या बातम्या

काँग्रेस- राष्ट्रवादीला झुकते माप देण्याचा प्रयत्न

नांदेड,बातमी24:- भाजप-शिवसेना सत्ता काळात जिल्हा नियोजन समितीवर शिफारशी होऊन ही चार वर्षे मुहूर्त लागला नव्हता,मात्र सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाआघाडी सरकारच्या काळात शिफारशीची प्रक्रिया सहा महिन्यांच्या आत होत असल्याचे दिसून येत आहे.यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी 14 नांवाची शिफारस असलेले नावे राज्य सरकारकडे पाठविले आहेत. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला झुकतेमाप देण्याचा प्रयत्न झाला आहे.

भाजप सरकारच्या काळात जिल्हा नियोजण समितीवर वर्णी लागावी,यासाठी प्रयत्न झाले.परंतु पाच वर्षाच्या काळात तीन पाकलमंत्री जिल्ह्याला मिळाले.एकाही पाकलमंत्र्यांनी उत्सह दाखविला नाही.त्यामुळे यादी पूर्ण होण्यास विलंब लागत गेला.

महाआघाडीच्या सरकारमध्ये सहा महिन्यात जिल्हा नियोजन समितीचा विषय मार्गी लागणार असून शिफारशीपत्र पाठविण्यात आले.

यामध्ये राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हरिहरराव भोसीकर,पत्रकार प्रदीप नागापूरकर, भाजपमधून कॉग्रेसमध्ये आलेले नागनाथ घिसेवाड,शिवसेना ज्योतिबा खराटे, रमेश देशमुख शिवणीकर, डॉ.पी.डी. पाटोदेकर,प्रकाश वसमते,नरेंद्र चव्हाण,अब्दुल रहेमान सिद्धीकी,सुभाष पाटील किन्हाळकर,नागनाथ घिसेवाड,प्रा.प्रकाश पोपळे,एकनाथ मोरे, बालाजी पाडागळे,डॉ.रेखा चव्हाण,नवनाथ चव्हाण, उपेंद्र तायडे व बालाजी शिंदे यांच्या शिफारशीचा समावेश आहे.