सर्दी-तापीची दहा लाख रुपये किंमतीचा औषधी जप्त

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः दहा लाख रुपये किंमतीची अवैधपणे केलेला औषधी साठा केलेली औषधी प्रशासनाने जप्त केला.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सदरचा केलेल्या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे.

मालेगाव रोडवरील प्रेमनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये ताप, सर्दी तसेच मल्टीव्हिटामीन इंजेक्शनचा साठा जमा केला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाली. यावरून अधिकार्‍यांनी त्या ठिकाणी धाड मारली, असता सर्दी,तापीची औषधी व मल्टीव्हिटामीन इंजेक्शनचा साठा मिळून आला.

या प्रकरणी औरंगाबाद येथील अम्यून्यू लाईफ सायन्स या पुरवठा कंपनीचे नांदेड येथील डिलर सतीश व्यवहारे यांची अधिकार्‍यांनी कसून चौकशी केली, असून खरेदी पावत्या, परवाने, यासबंधी कागदपत्रे मागविली असल्याची माहिती औषध निरीक्षक माधव निमसे यांनी दिली.
——
काय आहे नेमके प्रकरण

पुरवठादाराकडून प्राप्त झालेली औषधी ही साठा करून न ठेवता, मागणीदारास देणे अपेक्षीत असते. मात्र व्यवहारे यांनी स्वतःकडे ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात येथून मागणीदारांना पुरवठा केला जात होता, असे व्यवहारे यांचे म्हणणे असल्याचे निमसे यांनी सांगितले. ही कारवाई औषधी विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.