कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू तर 115 नवे रुग्ण

ताज्या बातम्या

 

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात बुधवारी 230 रुग्णसंख्येचा मोठा उचांक गाठला असताना गुरुवारी दि.20 रोजी 115 नवे रुग्ण सापडले आहेत.तर एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर 103 जणांची कोरोनातून सुटका झाली आहे.

गुरुवार दि.2 रोजी 738 अहवाल तपासण्यात आले. 575 निगेटिव्ह तर 115 अहवाल पॉझिटिव्ह आले.यात आरटी-पीसीआर चाचणीत 41 व अटीजनमध्ये 74 आले,असे जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 670 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.तर 2 हजार 803 जण बरे झाले आहेत.

आजघडीला 1 हजार 672 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तर 170 जणांची प्रकृती गंभीर आहे.तसेच किल्ला रोडवरील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला,असून जिल्ह्यात आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू ओढवला आहे.