खासदार चिखलीकर यांची केंद्राच्या महत्वाच्या समितीवर वर्णी

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः- नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड करण्यात आली.खासदार चिखलीकर हे केंद्रीय मंत्रालयाच्या विविध चार समित्यांवर निवड झालेली आहे.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चौथ्यांदा मोठी जबाबदारी सोपविली आहे.खासदार चिखलीकर हे सध्या कोरोना लढा देत असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील एमजीएम खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या निवडीबद्दल जिल्ह्यताील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे.