नांदेड, बातमी24:– कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव थांबवित असताना शाळा सुरू करण्याबाबत विचारविनिमय केला जात आहे. त्यापूर्वी विद्यार्थी सुरक्षा व संरक्षण महत्वाचे आहे, यांची प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत दिल्या.
शिक्षण समितीची बैठक मंगळवार दि.23 रोजी घेण्यात आली.या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह जिल्ह्यातील पंचायत समितीचे सर्व गटशिक्षणाधिकारी व दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीला मार्गदर्शन करताना श्री.बेळगे म्हणाले,की कोरोनाचे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या भागातील शाळा सुरू करण्यात येऊ नयेत.तसेच ज्यादा विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा सुरू करू नयेत.
शाळा सुरू करण्यापूर्वी दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय दौरा करावा,जेणेकरून शाररीक दुरु राखूण शाळा सुरू करता येतात का,तसे असेल तर शाळा सॅनिटायझर करून निर्णय घ्यावा,त्यासाठी त्या-त्या गावातील शाळेवर असलेल्या शिक्षकाना गावी राहणे बंधनकारक ठरणार आहे, अशा सूचना बेळगे यांनी दिल्या.
या बैठीकला गतशिक्षणाधिकारी आडे,विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी,शिंदे,इंगळे,मेकाले,जाधव, निझाम,आमदूरकर आदींची उपस्थिती होती