दिवसभरात पाच; 2 वर्षांच्या बालकाचा समावेश

ताज्या बातम्या

 

नांदेड,बातमी24;- बुधवारी दिवसभराच्या काळात 95 अहवालापैकी 85 अहवाल निगेटिव्ह आले,तर पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यात दोन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.तसेच तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पाच जणांच्या अहवालात बुधवार दि.24 जून रोजी सकाळी देगलूरनाका व गुलजारबाग येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तसेच रहेमत नगर येथील 36 वर्षीय व पीरबुऱ्हाण नगर मधील एकाच कुटूंबातील 2 वर्षीय मुलगा व 9 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 326 झाली आहे.248 जणांना उपचाराअंती सुट्टी देण्यात आली.तर 64 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.तसेच जणांची प्रकृती गंभीर असून यात दोन महिला व 4 पुरुषाचा समावेश आहे. एक 38 वर्षीय पुरुष वगळता इतर सर्वच्या सर्व जण 50 वर्षापुढील रुग्ण आहेत.