नांदेड, बातमी23;- चाळीस नमुन्यांची अहवाल मंगळवार दि.23 जून रोजी प्राप्त झाला आहे.यामध्ये 28 अहवाल निगेटिव्ह आणि चार अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर कोरोनाच्या चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारी 4,सोमवारी 8 तर मंगळवारी पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत. 40 अहवालात 4 पॉझिटिव्ह 28 निगेटिव्ह असून उर्वरित अहवालाबाबत प्रशासनाकडून खुलासा होऊ शकला नाही.
आज एकीकडे चार रुग्ण वाढत असले,तरी 7 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटर येथील 1, डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथील 5 व औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेला एक असे सात जणांचा समावेश आहे.
चार पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बिलाल नगर येथील 50 वर्षीय महिला,बोअरबन फॅक्टरी 35 वर्षीय पुरुष व पाच वर्षांचा सोलापूर येथील मुलगा आहे,परंतु एक रुग्णाची माहिती मिळू शकली नाही. चार रुग्ण गंभीर असून यात दोन महिला व दोन पुरुष आहेत