नांदेडच्या झेन सदावर्ते हिचा झी हिंदी टीव्हीकडून सन्मान

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः मुळ नांदेड येथील रहिवासी मुंबईस्थित मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकिल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची बारा वर्षांची कन्या झेन हिची शौय व ध्यैर्यासह जगभरातील राज्यघटनेची अभ्यासक म्हणून ओळख आहे. या वाघिनीचा नुकताच झी हिंदी वाहिन्याच्या लिटल चॅम्प या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला आहे.यापूर्वी झेन हिस शौर्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आला आहे.

सामाजिक दृष्टया वेगवेगळी प्रकरणात न्यायालयीन बाजू मांडणारे विधीज्ञ तथा सडतोड वक्ते म्हणून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे परिचित आहे. त्यांप्रमाणेच त्यांची कन्या झेन सदावर्ते ही सुद्धा धाडसी, जगभरातील काही भाषा तिस अवगत असून विविध देशांच्या राज्यघटनेचा तिने अभ्यास केला आहे. मुंबई येथील परेल भागात वास्तव्यात असलेल्या इमारतीला आग लागली होती. या वेळी तिने मोठ धाडस दाखवित दहा ते बारा लोकांचा जीव वाचविला होता.

या शौर्याबद्दल तिचा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्या भागात जाऊन झेन हिचा गौरव केला होता. या कार्याबद्दल शौर्य पुरस्कारने भारत सरकारच्या वतीने गौरविण्यात आले होते. या तिच्या कार्याची दखल घेत झी हिंदी वाहिनीवर सुरु असलेल्या सारेगमप लिटल चॅम्प या गाण्याच्या स्पर्धेत तिला बोलावून आयोजकांनी तिचा गौरव केला. नांदेडचे भूमिपुत्राची धाडसी कन्येने यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून नांदेडचा मान-सन्मान देश व राज्यस्तरावर वाढविला आहे.