भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा पॉझिटीव्ह

देश

नांदेड, बातमी24ः भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली येथे पावसाळी अधिवेशनाला रवाना झाले होते. तिथे ते कोरोना पॉझिटीव्ह आले आहे,असून त्यांच्यावर दिल्ली येथेच उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.यापूर्वी मागच्या महिन्यात खासदार चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोरोना चाचणी केली होती. यात ते निगेटीव्ह आले होते. त्यानंतर ते दिल्ली येथील अधिवेशनासाठी रवाना झाले असता, सकाळी खासदार चिखलीकर यांची चाचणी केली असती, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्हा आला आहे. यापूर्वी मागच्या महिन्यात खासदार चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते.

त्या वेळी खासदार चिखलीकर यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.यातून ते बरे झाल्यानंतर साधारणता पंधरा ते वीस दिवस ते सार्वत्रिक कार्यक्रमात ही सहभागी झाले होते. कार्यकर्ता व पदाधिकार्‍यांच्या भेटी-गाठीवर भर दिला होता. विशेष म्हणजे, दि. 11 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ते निगेटीव्ह आल्यानंतरच दिल्लीकडे रवाना झाले होते. मात्र संसदेत अधिवेशनाला जाण्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणी ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. सध्या खासदार चिखलीकर यांच्यावर दिल्ली येथेच उपचार असून प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.