आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची तोबा वाढ

देश

 

नांदेड, बातमी24ः-नांदेड जिल्हयात मागच्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली, असून मृत्यूची आकडा ही वाढला आहे. त्यामुळे संचारबंदीच्या आदेशाची प्रत्येक नागरिकाने अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यात पहिला रुग्ण दि. 22 एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली, मोजक्या काही दिवसांचा पडलेला खंड पाहता अधून-मधून रुग्ण संख्या वाढत गेली. बघता-बघता अडीच महिन्यांच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 585 झाली आहे. सहाशेचा आकडा रात्रीतून ही पार होऊ शकतो. अलिकडच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पंधर ते वीसच्या पुढेच आहे. तर आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 28 असून दोन रुग्ण हे रविवारी मरण पावल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रशासनाकडून यास दुजोरा मिळालेला नाही.

जिल्ह्यात दोन जुलैपर्यंत 398 रुग्ण संख्या होती. त्यानंतर दि. 3 जुलै रोजी 14 रुग्ण, दि. 4 रोजी 9 रुग्ण,दि.5 रोजी 14, दि. 6 रोजी 21, दि. 7 रोजी 26, दि. 8 रोजी 27, दि. 9 रोजी 30, दि. 10 रोजी 17 व दि. 11 जुलैपर्यंत 27 असे या आठ दिवसांच्या काळात 171 रुग्णांची वाढ झाली आहे.