मुंबई,बातमी24:- आयपीएस मनोजकुमार शर्मा आधारित असलेल्या अनुराग पाठक यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद पत्रकार, लेखक संदीप काळे केला आहे .ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘ट्वेल्थ फेल’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या हस्ते झाला.
शरद पवार म्हणाले,की
मुंबई असो की, महाराष्ट्र, देश आपण सुरक्षित आहोत, आपण आनंदाने बागडतोय त्याचं कारण, दक्ष असणारा पोलीस विभाग आहे. आपल्या अवती भोवती, खाकीत काम करणारा प्रत्येक घटक समाजासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे पवार यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती होती. पवार म्हणाले,की ग्रहखात्यामध्ये असलेल्या अनेक वेगळ्या अधिकाऱ्याचा उल्लेख करत हे सगळे अधिकारी समाजमनाचा आरसा कसे होते. याचे अनेक उदाहरणे दिली.
46 वर्षापूर्वी मी ग्रह खात्यामध्ये होतो, चार वेळा गृहखाते माझ्याकडे होतं त्यावेळी पोलिसांच्या प्रत्येक जडणघडणीचा साक्षीदार मला होता आल असल्याचे त्यांनी सांगितले.