नांदेड,बातमी24:-वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार देगलुर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोट निवडणूकीचे वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार म्हणून डॉ. उत्तम इंगोले यांना जाहीर करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली.ही निवडणूक विजयासाठी लढणार असल्याची माहिती वंचीत बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी दिली.
उमेदवाराचे डॉ. उत्तम रामराव इंगोले हे व्यवसायाने एम.बी.बी.एस.,एम.डी. (भूलतज्ञ) असून मागच्या १८ वर्षापासून देगलूर मध्ये नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉ. उत्तम रामराव इंगोले मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेसह सामाजिक कार्यात अग्रेसर असून फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून व संविधान जागरण समितीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सामाजिक विषयावर जागरण व आंदोलने केले आहेत.
मागील दोन दशकांपासून सातत्याने सामाजिक योगदान देताना वैद्यकीय क्षेत्रातही ते अग्रेसर आहेत रंजल्या गांजल्या यांच्या सेवेसाठी विशेषता ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी धन्वंतरी प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा केली आहे. ग्रामीण भागात सर्पदंश याविषयी असलेले अज्ञान दूर करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. उत्तम इंगोले यांनी ग्रामीण भागात जागरणा बरोबरच सर्पदंशावर प्रभावी उपचार करून शेकडो ग्रामीण रुग्णाचे प्राण वाचवले आहेत.
ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. उत्तम इंगोले यांनी गत लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी योगदान दिले असल्याचे रेखा ठाकूर यांनी कळविले.
——-
निवडणूक ताकदीने लढवून विजय मिळवू:-अहेमद
देगलूर-बिलोली विधान सभा पोटनिवडणूक पक्षाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढविली जाणार असून आमचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी व्यक्त केला.