नांदेड,बातमी24 :- 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 65 बाधित आले.तपाच जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात 236 कोरोना बाधिताना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या एकुण 972 अहवालापैकी 832 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 17 हजार 792 एवढी झाली असून यातील 15 हजार 392 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 820 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 43 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.
——-
पाच जणाचा उपचारा मृत्यू
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील 40 वर्षाची एक महिला, लोहा तालुक्यात कलंबर येथील 60 वर्षाची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी रुग्णालयात, बिलोली तालुक्यात डोणगाव येथील 50 वर्षाचा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर 15 ऑक्टोंबर रोजी हदगाव येथील 80 वर्षाची एका महिलेचा हदगाव कोविड केअर सेंटर येथे, समतानगर मुखेड येथील 70 वर्षीय एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 469 झाली आहे.