बाललैगिक शाैषण प्रकरणी एका 20 वर्ष सक्तमजुरी

नांदेड

 

मुखेड,बातमी24:-  अल्पवयीन मुलगी टीव्ही पाहण्यासाठी आली असता तिचेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी साक्षीपुराव्यानंतर अतिरिक्त जिल्हा व
सत्र न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांनी आराेपीस 20 वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

एप्रिल 2018 मध्ये शहरातील गायत्री गल्ली येथील एक सहा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरची टीव्ही खराब झाल्यामुळे शेजारी असलेल्या घरी गेली असता आराेपी
संताेष उर्फ बंटी राम घाेगरे याने तुला चाॅकलेट देताे असे म्हणून आतील घरात नेऊन चिमुरडीवर अत्याचार केल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी मुखेड पाेलिसांत दिली हाेती.याबाबत बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पाेलिस उप निरीक्षक कविता जाधव यांनी तपास करून न्यायालयात दाेषाराेप सादर केले होते.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांच्या समाेर सरकार पक्षाकडून अॅड. महेश कागणे यांच्याकडून सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. तसेच
पिडीत मुलीचा जबाब व वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून न्यायाधिश श्री. त्रिभुवन यांनी आराेपी बंटी उर्फ संताेष राम घाेगरे यास 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.