नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचा आकडा ही एक व दोन वाढत आहे. रविवारी सुद्धा कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तसे आरोग्य प्रशासनाकडून कळविण्यात आलेले नाही. एक मयत झालेला नांदेड शहर व परभणी शहरातील आहेत.
काल दिवसरभराच्या काळात 27 रुग्णांची वाढ झाली होती. तर एक रुग्ण मरण पावला होता. त्यापूर्वी गुरुवारी सांयकाळी मरण पावलेल्या रुग्णांचा अहवाल शनिवारी सकाळी देण्यात होता. त्यामुळे कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 28 इतकीच होती. रविवारी दुपारी दोन रुग्ण दगावल्याचे सांगण्यात आहे. यात एक रुग्ण हा परभणी येथील असून त्या रुग्णांवर नांदेड शासकीय रुग्णालयावर उपचार होत. या रुग्णाचे वय. 34 वर्षे असून परभणी येथील आनंदनगर चा रहिवासी होत.
नांदेड शहरातील सोमेश कॉलनी येथील 75 वर्षीय वृद्धाचा सुद्धा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या वृद्धास दि. 17 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 30 झाली आहे. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 585 वर पोहचली आहे.