माझी तब्यत ठणठणीत तुम्ही सर्व काळजी घ्या

नांदेड

नांदेड,बातमी24:- कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने मी रितसर विनाविलंब सोमवारी तपासणी करुन घेतली. यात मी कोरोना पॉझिटीव्ह आलो आहे.माझर तब्यत ठणठणीत आहे. तुम्ही सर्व काळजी घ्या, असे आवाहन कोरोनावर उपचार घेणार्‍या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

डॉ,. इटनकर म्हणाले, की यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक खबरदारी घेणे उचित समजून स्वत:हून आगोदर होम क्वारंटाइन झालो. त्यामुळे सोमवार 31 ऑगस्ट 2020 माझा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर मी नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार सुरु केले आहेत.

कोविड-19 हा संसर्गजन्य आजारासंबंधी प्रत्येक नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर असून तुम्हा सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर लवकरच यावर यशस्वी मात करून पुन्हा जोमाने काम सुरू करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.