जिल्हाधिकारी, आमदारासह प्रमुख अधिकारी होम क्वारंटाईन

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- कोण कधी कोरोना पॉझिटिव्ह निघेल याचा नेम नाही. यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण,आमदार मोहन हबर्डे यांचा स्वब पॉझिटिव्ह आला होता. सोमवार दि.20 जुलै रोजी विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांचा स्वब पॉझिटिव्ह आल्यानंतर जिह्यातील अधिकाऱ्यांना मोठा झटका बसला. त्यामुळे हदगाव मतदार संघाचे आमदार माधवराव जवळगावकर यांच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह सर्व बडे अधिकारी होम क्वारटाईन झाले आहे,होम क्वारटाईन झाले तरी अधिकाऱ्याकडून वर्क फ्रॉम होमच आहे.

आमदार अमरनाथ राजूरकर हे काही दिवस मुंबईत होते.मुंबईवरून आल्यानंतर त्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या शनिवारच्या बैठकीत हजेरी लावली होती.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषद सीईओ डॉ.शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खलाळ आदींची उपस्थिती होती. या बैठकीस काही आमदार मंडळी सुद्धा हजर होती.

सोमवार दि. 20 रोजी आमदार राजूरकर व त्याच्या धाकट्या कन्येचा रॅपिड टेस्टद्वारे घेण्यात आलेला अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राजूरकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व अधिकारी हे अलर्ट झाले,असून पुढील दक्षता म्हणून स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे.हे सर्व अधिकारी दोन दिवसानंतर स्वब देणार असल्याचे सांगण्यात आले.