चाचण्यांची संख्या घटल्याने बांधितांची संख्या निचांकी

नांदेड

नांदेड, बातमी24ःजिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या घटल्याने सोमवार दि. 11 रोजी बांधितांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे बघायला मिळाले.दिवसाकाठी प्रशासनाकडून हजार ते बाराशे जणांची तपासणी केली जात होती. सोमवारी मात्र यात मोठी घट झाल्याचे बघायला मिळाले.

मागच्या चौविस तासांमध्ये 510 नमूने तपासण्यात आले. यात 427 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 74 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. मागच्या तीन महिन्यांमध्ये निचांकी कोरोना बाधितांची संख्या येण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल, कदाचित नमूने एक हजारांपेक्षा अधिक तपासले गेले असते. तर बाधितांची संख्या वाढू शकली असती.

जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णसंख्या 17 हजार 494 झाली. यात 14 हजार 632 जण कोरोनामुक्त झाले. यात आज आलेल्या 235 जणांचा सुद्धा समावेश आहे.सध्या 2 हजार 295 जणांवर उपचार सुरु असून 43 जणांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, एकाचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.