संकटाच्या काळात नागरिकांनी संयम राखावा;प्रशासनास सहकार्य करावे:-डॉ.इटनकर

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिगंभीर नाही.रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबंध आहे.त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या कार्यास सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी.तसेच नागरिक घाबरून जातील असे वार्तांकन माध्यमांनी करणे थांबवावे असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर म्हणाले,की मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गाशी आपण लढा देत आहोत. त्या काळात आपण प्रशासनास सहकार्य केले.दुसऱ्या लाटेत केसेस वाढत आहेत. बाधित रुग्णांना सेवा देण्यासाचा शक्य तो प्रयत्न प्रशासन करत आहे.मात्र फारशे गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांनी बेड अडवून धरू नये,गंभीर रुग्णांना बेड मिळण्यास अडचणी येत आहेत.याचे भान सर्वांनी राखणे महत्वाचे आहे.गतवर्षीप्रमाणे
यावेळी सुद्धा प्रशासनास सहकार्य करण्याची वेळ आली असल्याचे डॉ.इटनकर यांनी नमूद केले.

समाज माध्यम असो किंवा प्रसार माध्यम सर्वांनी कोरोनाची आकडेवारी देताना नागरिक घाबरून जातील असे वार्तांकन करणे थांबवावे, रुग्ण मृत्यू होत असले,तरी रोज एक हजाराहुन अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला जात,या बाबीकडे लक्ष देण्याची आवाहन डॉ.इटनकर यांनी केले.समाजाचे मानसिक स्वास्थ आपणास मजबूत करायचे असून ही जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे डॉ.इटनकर यांनी अपेक्षा व्यक्त केली.