जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मोडले वाळूमाि फ यांचे कंबरडे;वर्षेभराचा काळ

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्याच्या काही दिवसांमध्ये डॉ. विपीन इटनकर यांच्यासमोर कोरोनासारख्या महामारीचे संकट उभे टाकले. कोरोनाच्या काळातील डॉ. इटनकर यांचे कार्य दखलपात्र राहिले. मात्र त्याहीपेक्षा डॉ. इटनकर हे वाळूमाफि यांचे कर्दनकाळ ठरले. वाळूच्या भरवशावर कोरोडपती होऊ पाहणार्‍यांना वाळूमाफि यांना मास्टरस्ट्रोक देत जेलची हवा दाखविली आहे. यातील बहुतांशी धाडसी कारवाया स्वतः नदीवर तर कधी नदी पात्रात जाऊन खुद्द त्यांनी केल्या.

नांदेड जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर हे दि. 17 फे बु्रवारी रोजी रुजू झाले. मार्च महिन्यात कोरोनाचे संकट सुरु झाले. लातूर सीईओ म्हणून प्रशासकीय कार्याचा अनुभव भक्कम होता. त्यासह आदिवासी दुर्गम भागात बजावलेली सेवा हे सुद्धा अनुभवाची मोठी शिदोरी होती. आपत्तीच्या काळात बलाढ्य नांदेड जिल्हा सांभाळण्याची एकाप्रकारे कसोटी होती.गोरगरिबांच्या भुकेचा प्रश्न सोडविण्यापासून ते परराज्यातील स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या गावी पोहचविण्यापर्यंत आणि रुग्णांना उपचारासह मृत्यूदर रोखणे या सगळया कार्यावर ते बारीब नजर ठेवून राहिले.

कोरोनाचे संकट उतरू लागताच त्यांनी जिल्हयाच्या विकासासह नाविन्यपूर्ण योजनांची कामे हाती घेतली. यात बेटी बचाओ बेटी पढाओ सारखे काम दखल पात्र असून घराच्या पाटीवर मुलीचे नाव घराची शान हे नाविन्यपूर्ण कार्य देशपातळीवर पुढील काळात दखलपात्र ठरणारे आहे. या कार्यात सीईओ वर्षा ठाकूर या सुद्धा महत्वाची भूमिका बजावत आहेत.

बेटी बचाओ बेटी पढाओ व कोरोनामुक्तीपेक्षा वाळूमाि फ यांना डॉ. इटनकर यांनी हवालदिल करून सोडले आहे. वाळूमाि फ यांची एकतफ र्ी सुरु असलेली दादागिरी मोडीत काढली आहे. नांदेड जिल्ह्यातील नदीघाट वाळूमाफिया नदीचे वाळवंट करू पाहत होत. डॉ. इटनकर हे पर्यावरणाचा रक्षणासाठी धावून आले. बर्‍याच वेळ स्वतः कारवाईसाठी मैदानात उतरले. अनेकांवर गुन्हे नोंद केले.टराफे जाळून टाकले. डॉ. इटनकर यांच्या वाळूसंबंधी अनेक कारवाया महसूली सिंघम म्हणून वाळूमाि फ यांच्या मनात धडकी भरविणार्‍या ठरल्या आहेत. डॉ. इटनकर हे चौकस दृष्टी ठेवणारे जिल्हाधिकारी तर आहेतच, शिवाय जिल्ह्याला दुरदृष्टी देण्याचा त्यांचा प्रयत्न हे त्यांच्या कृती कार्यक्रमांमधून दिसून येतो.