जिल्हाधिकारी राऊत यांनी साधला शेतावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद

नांदेड

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोहा तालुक्यातील
मौजे लोंढे सांगवी येथिल गावकऱ्यांशी शेतावर जाऊन संवाद साधला.यावेळी राऊत यांनी बोण्ड अळी व कीटकनाशक फवारणी व त्या दरम्यान घ्यावयाची काळजी बाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.तसेच जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करणाऱ्या एलईडी डिजिटल मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

लोंढे सांगवी येथे मंगळवार दि.29 रोजी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी विषबाधा प्रतिबंधात्मक उपाय योजना व गुलाबी बोंड आळी नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड मार्फत करण्यात आले होते.

सदरील कार्यक्रमात तज्ञ शास्त्रज्ञ , डॉक्टर व विभाग प्रमुख अधिकारी यांनी मार्गदर्शन केले व व कीटकनाशक फवारणी करताना घ्यायची काळजी बाबत प्रात्यक्षिक करून दाखविले सदरील कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थित व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमास विजय बेतीवार कृषी विकास अधिकारी जि‌ प. नांदेड,मा. पांडागळे शास्त्रज्ञ , मा डॉ.कळसाहीत उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड, तहसिलदार लोहा, अनिल जोंधळे कृषी अधिकारी लोहा व शेतकरी उपस्थित होते.