तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे डॉ. लहाने ठरले दुसरे आयुक्त; सेवेशी प्रामाणिकपणा जपणारे अधिकारी

नांदेड

नांदेड, बातमी24:- जग एका नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उभं होत,त्याच वेळी शहराच्या कारभाराची सूत्र हाती घेत, कोरोनापासून शहरातील नागरिकांचा बचाव व्हावा,यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले,त्या डॉ.सुनील लहाने यांनी नांदेड-वाघाला महापालिका आयुक्त म्हणून तीन वर्षे पूर्ण केली. तीन वर्षांचा आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे डॉ.लहाने हे दुसरे अधिकारी ठरले आहेत.याच सोबत ते प्रशासक म्हणून शहरातील नागरिकांचे पूर्णपणे प्रतिनिधित्व करत आहेत.

आपल्या संयमी,शांत स्वभावाप्रमाणेच एक सच्चा व प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी अशी डॉ.सुनील लहाने यांची ओळख राहिली आहे. कोरोनाचा दोन वर्षांचा काळ भयंकर होता.यात स्वतःच्या आरोग्याची चिंता न करता ते काम करत राहिले, यातून त्यावेळी शहरातील सर्व शहरी रुग्णालय ऍक्टिव्ह मोडमध्ये आणली.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्यासोबत अहोरात्र काम करून शक्य तो रुग्णांना सेवा आणि मदत देण्यात त्यांचा महत्वाचा रोल राहिला.ते स्वतः दोन वेळा कोरोना बाधित झाले.

आयुक्त म्हणून डॉ.लहाने यांनी दि.7 एप्रिल 2020 झाली पदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हा भारतभर ताळेबंदी होती.स्वतः गाडी चालवित नांदेड गाठले होते,अशी आठवण डॉ.लहाने यांनी सांगितली.

जबाबदारी व मागासलेपणाची जाणीव ठेवून सर्वांशी सन्मानाची वागणूक देणारे अधिकारी, असा त्यांचा स्वभाव राहिला आहे.स्वतःचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आपुलकी स्नेह जपतात. मात्र कामा प्रति वेळे प्रसंगी कठोर सजग  व प्रेमळ अधिकारी म्हणून परिचित होय.

नांदेड-वाघाला महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत तीन वर्षापेक्षा सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून राहणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये डॉ.सुनील लहाने हे दुसरे अधिकारी ठरले आहेत.यापुर्वी डॉ.दीपक म्हैसेकर हे सर्वाधिक चार वर्षे आयुक्त पदावर कार्यरत होते.ते दि.13-7-2006 ते 04-08-2010 असा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता.त्यानंतर आता लहाने यांचा सर्वाधिक काळ आयुक्त पदावर राहण्याचा विक्रम झाला आहे. शहरी नागरिकांच्या हिताला ज्याप्रमाणे हे प्राधान्य देतात,तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे सुद्धा दूत म्हणून ते महत्वपूर्ण राहिले आहेत.

डॉ. लहाने यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्याचा आकृतीबंध लागू झाला आहे,यास शासनाने मंजुरी सुद्धा दिली, सातवा वेतन आयोग लागू करत कर्मचाऱ्याचा आर्थिक स्तर उंचावला आहे,शंभराहून अधिक शिपाई वर्गातील चतुर्थ कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर पदोन्नती बहाल,घनकचऱ्यापासून खत निर्मिती हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास,सोबत पाणी, आरोग्य व दिवाबत्ती या सुविधा कायम राखण्यात ते यशस्वी ठरले असून विशेषतः आयुक्त व प्रशासक अशी दुहेरी भूमिका पार पाडत आहेत.