नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील झालेल्या तीन नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात दोन नगरपंचायतीवर काँग्रेस तर एका नगरपंचतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे.कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्यात यश आले.सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे देगलूर पोटनिवडणुकीतील विजया नंतर नगरपंचायत निवडणुकीतील विजय हा त्यांचे नेतृत्व ववर्चस्व पुन्हा सिद्ध करणारा ठरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, नायगाव व माहुर नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला.यात अर्धापुर नगरपंचायतीमध्ये काँग्रेस-10,एम आय एम-3,भाजप-2,राष्ट्रवादी-1 व एक अपक्ष असे संख्याबळ असून येथे पुन्हा एकदा काँग्रेसने सत्ता कायम राखली आहे.
नायगाव नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 17 जागा काँग्रेसने जिंकत एक हाती सत्ता मिळविली.येथे भाजपचा विद्यमान आमदार असून एक भोपळा फोडता आला नाही.येथे माजी आमदार वसंत चव्हाण यांनी आपला करिष्मा कायम राखला.
माहूर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीकडे सत्ता राहील असेच चिन्हे असून येथे राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ घ्यावी लागणार आहे.फिरोज डोसानी यांचा नगरपंचायतीवर डोलारा टिकून असल्याचे बघायला मिळाले.
यात राष्ट्रवादीला सात जागा,काँग्रेस-6,शिवसेना-3,भाजप 1असे संख्याबळ आहे. तिन्ही नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक 33 जागा काँग्रेस, राष्ट्रवादी-8,भाजप-3,शिवसेना-3,एम आय एम-3 व अपक्ष 1 असे संख्याबळ आहे.